मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दित भोवतीच्या नसते कधीकधी
येथे न ओलखीचे कोणीच राहिले
होतात भास् मजला नुसते कधीकधी
जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवित आसवे मी हसते कधीकधी
मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी
जखमा बुजुन गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवित जीवनाला बसते कधीकधी...
एल्गार - सुरेश भट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा