सूर्य-वंशी उत्तानपाद राजा ॥ रूपवंती तयास दोन भाजा ॥ कनिष्ठेशी अत्यंत प्रीत-माया ॥ पट्टराणीची पडो न दे छाया ॥१॥ वरिष्ठेसी जाहला एक पुत्र ॥ भक्त-राज वैकुंठ-पाळ-मित्र ॥ सु-कुमार आ-कर्णे-पद्म-नेत्र ॥ ठाण माण रेखिले जेवि चित्र ॥२॥ पांच वर्षे लोटली ध्रुवा आंगी ॥ पिता ठाऊका नाही तयालागी ॥ पुसे मातेसी भक्त-राज योगी ॥ तात कोठे तो सांग मला वेगी ॥३॥ म्हणे माता तान्हया तोचि तूझा ॥ धराधीश बोलती ज्यास प्रजा ॥ येरु बोले पाहीन पिता माझा ॥ नको जाऊ मारील राज-भाजा ॥४॥ पूर्व-पुण्ये शुभ दिवस ऊगवला ॥ मुलांसंगे तो राज-गृहा गेला ॥ राज-दृष्टी सन्मूख उभा ठेला ॥ पिता पाहे तो मोह झळंबला ॥५॥ अ-नीवार मोहास पूर आला ॥ ऊचलोनी मांडिये बैसवीला ॥ बाळ-शब्दे खेळवी तनू-जाला ॥ न साहे ते राणीस कोप आला ॥६॥ उचंबळे क्रोधाग्नि शिखा टाकी ॥ कवण बोले बैसला राज-अंकी ॥ राव कैसा खेळवी कवतूकी ॥ ध्रुव राजा होईल धरा-लोकी ॥७॥ धरोनीया सापत्न-भाव चित्ती ॥ पदे लोटोनी पाडियला क्षीती ॥ रडत गेला माउली जेथ होती ॥ अश्रु-पाते हालवी नेत्र-पाती ॥८॥ म्हणे माता तान्हया काय झाले ॥ कोण पापीये तूज गांजियेले ॥ मला राये मांडिये बैसवीले ॥ राज-भाजेने पदे लोट...