या रस्त्याला फांदीवरती
लागुनिया धस चिरून
पडले
नाव तुझे
या वाटेवर कुण्या नदीने
नेले वस्त्रापरी ओढुनी
गाव तुझे
या मुलुखातील पंचभूतानी
ओरबडोनी सर्व तोडले
मखर तुझे
केवळ माझ्या नभांत स्त्रीपण
अंबरात ज्वालेपरी उरले
प्रखर तुझे
: केवळ
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा