मुख्य सामग्रीवर वगळा
दुःख कधीच संपले
सुकलेल्या चांदण्यांचे
क्लेश उरले नाहीच
निबर या पापण्यांचे
याच कोवळीकतेसाठी
केला होता खटाटोप :
पण चंद्र करपला
मोडे अर्ध्यावर झोप
हसण्याच्या आड पण
कधी तरी चंद्र रडे
कमावलेल्या गाण्यांमध्ये
वारा कण्हत ओरडे
: चंद्र
: उत्सव
: मंगेश पाडगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा