हवीशीचे नाव होते
नकोशी
नकोशीचे नाव फक्त
नभाशी .
नकोशीला घर नाही
दार नाही
वेगवेड्या तुफानास
पार नाही.
नकोशिला शील दिले
वरुणाने
कुंतलास पीस दिले
अरुणाने.
नकोशिच्या पापणीत
ओठावर
गंधर्वाच्या
मदिरेचे
दहिवर .
हवी अशी नकोशी
हि
लाखदाही
आणि नको तरी
मला
एकदाही
कारण माझ्या नकोशिची
अशी अट
जीवनाच्या ज्वलनात
व्हावी भेट .
: नकोशी
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा