अंतर होते तसे
परंतु
असेही आता पडावयाचे
माहित होते मनामनाला
अखेर हेही
घडावयाचे .
खंत कशाला श्रावणतेचा
खजिना फुटला गगनावरती
इंद्रजाल हे काय
कुडाच्या
या भिंतीवर
चढावयाचे ?
नियती देते दान
असे कि
खिशांमध्ये जे मावत
नाही
खिशे असे कंगाल
मिळाले
त्यासाठी का कढावयाचे
?
अपुल्या भिंती खिसेही अपूले
अभेद्य त्यांची हुकुमत
असते
म्हणून का तिमिराचे
घुंगट
या घटकेवर
विनावयाचे ?
: सांत्वन
: वादळवेल
: कुसुमाग्रज
jabardast collection!!!
उत्तर द्याहटवाMindsriot.blogspot.com
me pan blog lihito pan maze contents khup random asatat, i was quite impressed by seeing your blog...thanks
उत्तर द्याहटवा