झाडांना पानोपानी
असतात नेत्र हे
कळले
हे पाय तुझ्या
सदनाच्या
बाजूस जेधवा वळले
.
मी म्हंटले शूरपणाने
ना यात
वाकडे काही
हि दोन मनांची
यात्रा
पार्थिवात नाही-नाही
पण झाडे मख्ख
उभी ती
राहिली तशीच पहात
पांघरून खांद्यावरती
ती ढगाळ
धुसर रात
चालेल म्हणाला चंद्र
चांदण्या म्हणाल्या छान
पण झाडांच्या नजरेने
हलले न
एकही पान
: झाडे
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा