शंभर स्मितांचे
अडसर तुवा
घातलेस तरी
कट्यारी डोळ्यांचे
कठोर पहारे
ठेवलेस तरी
चंद्राळ स्पर्शाचे
आरस्पानी तट
बांधलेस तरी
खंदक दाराने
पापणी दवाने
भरलेस तरी
तुफानाशी सात
जन्माचे हे नाते
तोडशील काय
ललाटीचा लेख
उध्वस्थ होण्याचा
खोडशील काय?
: तरी
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा