चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी.
बिलगलं उन्ह मन झालंया मोरणी
रानोमाळ सर्व्या हिर्व्या पाखरांची गाणी
राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी.
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंधी झिम्मा झालं आभाळअस्मानी.
पिकातून पाखरांचा धिंगाणा मनमानी
केसरात न्हाली कोणी मैना गोजिरवाणी .
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
: ना. धों. महानोर
: पानझड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा