सारा स्वार्थाचा गलबला
भाऊबंद झाले गोळा
आणि पसार होतांना
संसाराचा चोळामोळा.
जीवनाची टांगाटोली
किती सोसू कशी सोसू ?
डोळे जाळून पापण्या
आता उरले ना आसू.
मळा बहराला यावा
तेव्हा चेटूक काढले
वाळवंटाच्या वाटांशी
घर मोडीत निघाले.
अवघे आयुष्य देतांना
काही राहिले न देवा
तुझ्या अस्तित्वाच्या ठायी
आत्ता देई गा विसावा.
: पानझड
: ना. धों . महानोर .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा