खळेना घडीभर ही बरसात
दिवस संपला नागिणकाळी-
उतरे सळसळ रात..
दिवस संपला नागिणकाळी-
उतरे सळसळ रात..
नक्षत्रांसह दिशा लोपल्या
वाटा अंधाराने गिळिल्या
असेल कोठे सखा-
पाऊले वाजती जरी थेंबांत..
वाटा अंधाराने गिळिल्या
असेल कोठे सखा-
पाऊले वाजती जरी थेंबांत..
गडगडणे थांबवा घनांनो
कडकडणे आवरा विजांनो
बायांनो का तुम्हांही न कळे-
स्त्री हृदयाची मात..
कडकडणे आवरा विजांनो
बायांनो का तुम्हांही न कळे-
स्त्री हृदयाची मात..
असेल आला पैलतटावर
येऊ द्या ग त्याला इथवर
संथ वहा ग सरिते तूही
येतो माझा नाथ
येऊ द्या ग त्याला इथवर
संथ वहा ग सरिते तूही
येतो माझा नाथ
वा. रा. कांत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा