राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली ती ती खरे की स्वप्न
माझे
कापरे हात हाती बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे
दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे
गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमले
कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी तारकांची
आजवेळ म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे
आजवेळ म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे
मी म्हणू कैसे फुल रे आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजुनी बहार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनि पात्र माझे
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनि पात्र माझे
वा. रा. कांत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा