संपला उन्हाळा जेष्ठांचा महिना
आभाळाला पान्हा अमृताचा
मृगनक्षत्राची साधली पेरणी
अंकुरली लेणी हिरवीगार
रानोमाळ आता पिकांचा दरवळ
पुढे ते सांभाळ पांडुरंगा
अवघ्या दुःखाचा झालासे कैवारी
आषाढाची वारी जन्मभरी
टाळ मृदूंगाची निघाली पालखी
तुझीच अलोखी विठुराया
तुझ्या दर्शनाला आसुसले दिंडी
फोडू दहीहंडी महाद्वारी
: पालखीचे अभंग
: पानझड
: ना. धों. महानोर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा