असा मोगरा समोर फुलता
दुरपणाचा दत्तक बाणा
कसा रहावा
मलयगंध देहात दाटता
गतागताचा शीर्ण नकाशा
कुणी पहावा
इंद्रजाल हे असे
उमलता
स्वप्न म्हणे ही जमीन
माझी
घटकेकरिता
सागर विसरुनी , धवल फुलांनो
तुमच्यासाठी
उभी राहिली
जीवनसरिता .
: मोगरा
: वादळवेल
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा