सुन्न खिडकीवर
कर्कश करवत
किर्रर् कावळ्याची.
तापकरी ग्लानीसारखी
बाहेर दुपार,
कोरड अपार .
काटेरी फेरीवाला
आवाजाचे आंधळे ओरखडे
ओढीत जाणारा
अटळ.
विचित्र कोळी
कपाळातून
भगभगत सरकणारा
रितेपणा विणीत.
भिंतीवर घड्याळ
सुजमट चेहेऱ्याचे .
तापकरी ग्लानीसारखी
बाहेर दुपार,
कोरड अपार .
: मूड
: भटके पक्षी
; मंगेश पाडगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा